स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार विशेष सरकारी वकील   

शिवशाही बसमधील अत्याचार

पुणे : स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने वकील अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.  स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ फेबु्रवारी रोजी पहाटे एका तरूणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला अटक करण्यात आली होती. सध्या गाडे हा न्यायालयीन कोठडीत आहे. या गंभीर गुन्ह्याच्या खटल्यामध्ये प्रभावी न्यायप्रक्रिया पार पाडण्यासाठी वकील अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात होणार आहे.

Related Articles